मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ठाकरे व पवार कुटुंबीयांतील जवळीक वाढली आहे. राज्यातील राजकीय प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सातत्यानं भेटीगाठी होत असतात. मात्र, पवार-ठाकरे कुटुंबीयांची सोमवारी झालेली भेट काहीशी वेगळी होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं ही दोन्ही कुटुंबं एकत्र आली होती. वाचा: मुख्यमंत्र्यांच्या '' या शासकीय निवासस्थानी प्रतिवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपला मुक्काम 'वर्षा' निवासस्थानी हलवला नसला तरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार हे काल सहकुटुंब 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले. प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे व सदानंद सुळे हे देखील त्यांच्यासोबत होते. ठाकरे कुटुंबीयांनी या सर्वांचे स्वागत केले. गणपती दर्शनानंतर सर्वांनी एकत्रित फोटोही काढले. सुप्रिया सुळे यांनी स्वत: हे फोटो ट्वीट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये शरद पवार व प्रतिभाताई गणरायाचे दर्शन घेताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये दोन्ही कुटुंबासोबत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत हेही दिसत आहेत. याशिवाय, एका फोटोत सुप्रिया सुळे सेल्फी काढताना दिसत आहेत. या फोटोला सुप्रिया यांनी My CKP Moment अशी कॅप्शनही दिली आहे. आणखी वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lC0Ou8

0 Comments