Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! रेल्वे स्थानकातील रेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकातील व्हीआयपी रेस्ट हाऊसमध्ये एका तरुणीवर झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी रेल्वेचे कर्मचारी असल्याचे उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेल्वेचे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी यांनी सांगितले की, तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली भोपाळ रेल्वे मंडळाचे सुरक्षा सल्लागार पदावर कार्यरत ४५ वर्षीय राजेश तिवारी याला अटक केली आहे. तर अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. तो सुद्धा रेल्वे कर्मचारी आहे. उत्तर प्रदेशातील महोबा येथील २२ वर्षीय तरुणी आणि तिवारी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. तिवारीने तिला नोकरीचे प्रलोभन देऊन भोपाळला बोलावले. तरुणी शनिवारी सकाळी भोपाळ रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यावेळी त्याने तिला स्थानकातील व्हीआयपी रेस्ट हाऊसमध्ये थांबवले. तिवारी दुपारच्या सुमारास आपल्या एका सहकारी कर्मचाऱ्यासोबत तरुणीला भेटण्यासाठी आला. तिला काहीतरी प्यायला दिले. त्यात गुंगीचे औषध होते. ते प्यायल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिवारीला अटक केली. तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे साथीदाराला ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/346j9aK

Post a Comment

0 Comments