Ticker

6/recent/ticker-posts

यू-टर्न ; शेअर बाजारात तेजी, रिलायन्सचा शेअर उच्चांकावर

मुंबई : ब्लूचिप शेअर्सच्या खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात बँका, वित्तसंस्था , हॉटेल इंडस्ट्री, ऑटो आदी क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला आहे. सध्या तो ३८४८५ अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८ अंकांनी वधारला असून तो ११३५६ अंकांवर आहे. सध्या बाजारात सारेगामा, इंडियन हॉटेल्स, जुबिलंट फूड वर्क्स, लेमन ट्री, महिंद्रा हॉलिडेज, आयआरसीसीटीसी, टाटा मोटर्स, येस बँक, व्होडाफोन, फ्युचर कन्झुमर, ऍक्सिस बँक आदी शेअर तेजीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज बाजारात सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे. रिलायन्सचा शेअर १.८७ टक्क्यांनी वधारला असून तो २२०१ रुपयांवर गेला आहे. रिलायन्सने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स रिटेल कंपनीतील १० टक्के हिस्सा विकणार आहे. या प्रक्रियेत त्यांना सिल्वर लेकच्या रुपाने पहिला मोठा गुंतवणूकदार मिळाला आहे. अमेरिकेतील इक्विटी फर्म KKR आणि फेसबुक देखील रिलायन्समध्ये गुंतवणूक करू शकते. KKRने जिओत११ हजार ३६७ कोटी तर फेसबुकने ४५ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. बुधवारच्या सत्रात वित्तीय शेअर्सची घसरण झाल्यानंतर भारतीय बाजार निर्देशांकांत पडझड दिसून आली.निफ्टी ३९.३५ अंकांनी घटला आणि ११२७८ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १७१.४३ अंकांनी घसरून ३८१९३.९२ अंकांवर बंद झाला. बाजारात बुधवारी झी एंटरटेनमेंट , टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सिप्ला आणि ग्रासिम इंडस्ट्रीज हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. एसबीआय, गेल, बजाज फिनसर्व्ह , अॅक्सिस बँक आणि आयओसी हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.२८ टक्के आणि ०.९४ टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी बँकेने २ टक्क्याची घसरण नोंदवली तर निफ्टी आयटी व निफ्टी एफएमसीजीदेखील प्रत्येकी अर्ध्या टक्क्याने घटले.अस्थिर देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.५३ रुपयांवर बंद झाला होता. जागतिक आर्थिक सुधारणेसंबंधी वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आशियाई स्टॉक्सनी घसरण घेतली तरी युरोपियन शेअर बाजार तेजीसह बंद झाले. नॅसडॅक, निक्केई २२५, हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ४.११ टक्के, १.०४ टक्के आणि ०.६३ टक्के घसरले. एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.७१ टक्के आणि ०.५० टक्क्यांनी वाढले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3m9dwk4

Post a Comment

0 Comments