Ticker

6/recent/ticker-posts

अभिनेत्री कंगना रनौटच्या 'तेजस'चं डिसेंबरमध्ये उड्डाण

मुंबई :गेल्या वर्षी आलेल्या ''च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते हवाई दलावर आधारित एक चित्रपट तयार करणार आहेत. '' असं नाव असलेल्या या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरमध्ये सुरुवात होतेय. यामध्ये अभिनेत्री एका फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वेश मेवाडाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट आपल्या देशाच्या सशस्त्र दलांना सलाम करणारा आहे; असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. कंगना याविषयी सांगते की, 'तेजस' ही विविध बारकाव्यांसह सांगितली जाणारी एक कहाणी आहे, ज्यात मला हवाई दलातील पायलटची भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे. अशा चित्रपटाचा भाग बनता येत असल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजते आहे. आपल्या कर्तव्यावर तैनात असलेल्या आणि देशासाठी वेळप्रसंगी प्राण अर्पण करणाऱ्या बहाद्दर सैनिकांना दिलेली ही मानवंदना आहे. या चित्रपटात सशस्त्र दलांचा आणि त्यातील काही पराक्रमी हिऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वेश आणि रॉनीबरोबर हा प्रवास करण्यासाठी मी खूप उत्साही आहे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hA1mhw

Post a Comment

0 Comments