मुंबई: अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायलाच हव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. माजी शिक्षण मंत्री यांनी खोचक शब्दांत सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी शेलारांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. करोनाच्या संकटात परीक्षा घेता येणार नाहीत, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारनं सुरुवातीपासूनच घेतली होती. मात्र, विरोधी पक्ष भाजप त्यावर ठाम होता. यूजीसीनंही परीक्षा व्हायला हव्यात अशी भूमिका घेतली होती. हा वाद शेवटी न्यायालयात गेला. त्यावर काल न्यायालयात सुनावणी झाली. राज्यांना परीक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे, पण परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नाही, असं सांगत ३० सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असं निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेकडे बोट दाखवलं होतं. शेलारांनीही त्यांचीच री ओढत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. एका मराठी टीव्ही मालिकेतील पात्राचा उल्लेख करत शेलार यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार...! ऐकतो कोण?,' असं शेलार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्वीटच्या माध्यमातूनच सडेतोड उत्तर दिलं आहे. वाचा: 'आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान स्वत:च्या ट्वीटखालील रिप्लाय तरी वाचाल,' असा टोला रोहित यांनी शेलारांना हाणला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2EKPpXX

0 Comments