 
नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा मजेदार गोष्टी घडत असतात. काही खेळाडूंची फलंदाजी इतकी आक्रमक असते की त्यांनी मारलेला चेंडू मैदानाबाहेर जातो. काही वेळा चेंडू मैदानाजवळ असलेल्या घरातील काच फोडतात. पण एका क्रिकेटपटूने स्वत:च्या गाडीची काच फोडली. वाचा- आयर्लंडचा स्टार क्रिकेटपटू याने गुरुवारी एका सामन्यात अन्य कोणाच्या नव्हे तर स्वत:च्या गाडीची काच फोडली. पेम्ब्रोक येथे टी-२० इंटर प्रोव्हेंशिल सीरिजमध्ये केव्हिन ओ ब्रायनने लेन्स्टर लायटनिंग संघाकडूनन खेळताना ३७ चेंडूत ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे लायटनिंगने नॉर्थ वेस्ट वॉरियर्सविरुद्ध १२ षटकात ४ बाद १२४ धावा केल्या. वाचा- या सामन्यात केव्हिन ओ ब्रायनने मारलेला एक षटकार थेट मैदानाबाहेर उभारलेल्या त्याच्या गाडीवर पडला आणि गाडीची काच फुटली. क्रिकेट आयर्लंडने त्याच्या गाडीचा फोटो शेअर केला. केव्हिन ओ ब्रायनने ३ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २२१ पेक्षा जास्त होता. त्यानंतर नॉर्थ वेस्ट वॉरियर्सला १२ षटकात ८ बाद १०४ धावा करता आल्या. लायटनिंगने हा सामना डकवर्थ लुइस नियमानुसार २४ धावांनी जिंकला. वाचा- ब्रायनने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये ३ कसोटी, १४८ वनडे आणि ९६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे २५८, ३ हजार ५९२ आणि १ हजार ६७२ धावा केल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2D4U9XK
 

 
0 Comments