
वॉशिंग्टन: काळा समुद्रात अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. रशियाच्या सुखोई-२७ लढाऊ विमांनांनी अमेरिकेच्या अणवस्त्रवाहू बी-५२ या बॉम्बरला घेरले. यामुळे नाटो देशांमध्ये खळबळ माजली आहे. या बॉम्बर विमानाने ब्रिटनहून उड्डाण घेतले होते आणि काळा समुद्रावर गस्त घालण्यास सुरुवात केली होती. नाटो सदस्य असलेल्या अमेरिकेने रशियासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये सहा बी-५२ अणवस्त्र बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. त्यातील एका अणवस्त्रवाहू बॉम्बरने काळा समुद्रावर गस्त घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान रशियाच्या सुखोई-२७ विमानांनी अमेरिकेच्या बॉम्बरला अतिशय धोकादायक पद्धतीने घेरले होते. रशियन लढाऊ विमाने अमेरिकेच्या बॉम्बरजवळ गेली असल्याचे व्हिडिओत समोर आले आहे. रशियन विमानांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियन हवाई दलाचे वर्तन हे अव्यावसायिक आणि बेजवाबदार असल्याचेही अमेरिकेने म्हटले. वाचा: या रशियन विमानांनी क्रिमीयातून उड्डाण घेतले असल्याचे म्हटले जाते. नाटो देशांनी हल्ला केल्यास तातडीने प्रत्युत्तर देता यावे यासाठी क्रिमीयामध्ये मोठ्या प्रमाणावर रशियाने आपले लढाऊ विमाने तैनात केली आहेत. या लढाऊ विमानांवर काळा समुद्रावर देखरेख ठेवण्याचीही जवाबदारी आहे. वाचा: बेलारूसमध्ये राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात नागरिकांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाश्चिमात्य आणि नाटो देशांची फूस असल्याचा आरोप लुकाशेन्को यांनी केला आहे. रशियाने लुकाशेन्को यांना पाठिंबा दिला असून नाटोनो त्यांना विरोध केला आहे. लुकाशेन्को जवळपास २६ वर्ष सत्तेवर आहेत. नाटो आणि रशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपले सहा बी-५२ या बॉम्बर विमानांना ब्रिटनमध्ये तैनात केले आहे. ही विमाने १२० क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. त्यातील काही अणवस्त्रांनीहीदेखील सज्ज आहेत. वाचा: दरम्यान, रशिया आणि अमेरिकेच्या सैन्यांमध्ये सीरियात तीव्र संघर्ष झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात काही सैन्य जखमी झाले आहेत. यु्द्धाच्या झळा सहन करत असलेल्या सीरियात अमेरिका-रशियाच्या सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31IfMa1
0 Comments