Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! तरुणाला निर्वस्त्र करून भरबाजारात काढली धिंड

अहमदाबाद: गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात एका तरुणाला निर्वस्त्र करून त्याची भरबाजारात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपींनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. तरुणाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात त्याने आरोपींवर क्रिकेटवर सट्टा लावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते चिडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी या तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला धमकावले. इतकेच नाही तर त्याला निर्वस्त्र करून खंभालियामध्ये भरबाजारात त्याची धिंड काढली. या प्रकरणी पीडित तरुणाने एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी आणि संबंधित तरूण हे सर्व नातेवाईक आहेत. तरूण आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. या तरुणाविरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36wEXhV

Post a Comment

0 Comments