Ticker

6/recent/ticker-posts

सचिनने जे ३०० डावात केले ते विराटने २४२ डावात करून दाखवले

कॅनबेरा: भारताचा कर्णधार याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा केला. विराटने भारताचा मास्टर ब्लास्टर याला मागे टाकले. वाचा- सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ३०० डावात १२ हजार पूर्ण केल्या होत्या. विराटने ही कामगिरी फक्त २४२ धावात केली आहे. कॅनबेरा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत विराटने २३वी धाव करताच त्याने या विक्रमाला गवसणी घातली. वाचा- याआधी विराटने वनडेमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. वाचा- विराटच्या धावांचा वेग १ हजार धावा- २४ डाव २ हजार धावा- ५३ डाव ३ हजार धावा- ७५ डाव ४ हजार धावा- ९३ डाव ५ हजार धावा- ११४ डाव ६ हजार धावा- १३६ डावा (हाशिम अमला १२३ डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ७ हजार धावा- (हाशिम अमला १५० डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ८ हजार धावा- १७५ डाव (सर्वात वेगाने) ९ हजार धावा- १९४ डाव (सर्वात वेगाने) १० हजार धावा - २०५ डाव (सर्वात वेगाने) ११ हजार धावा- २२२ डाव (सर्वात वेगाने) १२ हजार धावा- २४२ डाव (सर्वात वेगाने) विराटने २५० वनडे सामन्यातील २४१ डावा ५९.२९च्या सरासरीने ११ हजार ९७७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४३ शतक आणि ५९ अर्धशतक आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JuNoBr

Post a Comment

0 Comments