नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा आलेख थोडा खाली गेल्याचं दिसल्यानंतर आता पुन्हा एकदा या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोबतच, करोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झालीय. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत (शुक्रवारी सकाळी ८.०० पासून शनिवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) करोनाचे ५० हजार ३५६ नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ५३ हजार ९२० रुग्णांनी करोनावर मात केल्याचंही दिसून येतंय तर या दरम्यान ५७७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत करोनाच्या रुग्णांची संख्या आता ८४ लाखांच्या घरात पोहचली आहे. देशात करोना संक्रमितांची एकूण संख्या ८४ लाख ६२ हजार ०८० वर पोहचलीय. यातील एकूण १ लाख २२ हजार १११ जणांना कोविड १९ मुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण ७८ लाख १९ हजार ८८६ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर एकूण ५ लाख १६ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात २ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ही संख्या इतकी खाली आलीय. देशाचा (बरे झालेले रुग्ण) ९२.१४ टक्क्यांवर पोहचलाय. पॉझिटिव्हीटी रेट (चाचणीत एकूण नमुन्यांपैंकी संक्रमित आढळलेले रुग्ण) ४.५२ टक्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.४८ टक्क्यांवर आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी एकूण ११ लाख १३ हजार २०९ नमुन्यांची तपासणी पार पडली. करोनाच्या धर्तीवर आत्तापर्यंत एकूण ११ कोटी ६५ लाख ४२ हजार ३०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. इतर बातम्या : वाचा : वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mSSy8O

0 Comments