Ticker

6/recent/ticker-posts

इंधन दरवाढ ; आज पुन्हा महागले पेट्रोल-डिझेल

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज शनिवारी देशभरात १५ पैसे तर डिझेल २० पैशांनी महागलं आहे. युरोपात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात टाकले आहे. परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनीवरील दबाव वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. काल पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढले होते. आज पुन्हा पेट्रोलमध्ये १५ पैसे तर डिझेलमध्ये २० पैसे वाढ झाली आहे. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.०९ रुपये आणि डिझेल ७७.३४ रुपये झाला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.३८ रुपये असून डिझेल ७०.८८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.४६ रुपये असून डिझेल ७६.३७ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.९५ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.४५ रुपये प्रती लीटर झाले आहे. युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. जर पुन्हा कठोर लॉकडाउन झाल्यास नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमतीतील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून उत्पादन कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज सिंगापूरमध्ये क्रूड ऑइलचा भाव ०.४१ डॉलरने वाढून प्रती बॅरल ४२.१५ डॉलर झाला. त्याचबरोबर ब्रेंट क्रूडचा भाव ०.७६ डॉलरने वधारून ४४.९६ डॉलर इतका झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36YNnh0

Post a Comment

0 Comments