Ticker

6/recent/ticker-posts

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला लाइक्सपेक्षा डिसलाइक्स जास्त

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी बर्‍याचदा चर्चेत असतात. आता पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं नवं मराठी गाणं रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडलं नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या गाण्याला लाइक्सपेक्षा जास्त लोकांनी डिसलाइक्सच दिले आहेत. याशिवाय अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत अमृता फडणवीस या गायिका असून त्यांनी 'तिला जगू द्या' हे नवीन गाणं यूट्यूबवर रिलीज केलं. भाऊबीजेच्या मुहूर्तावर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात मुलींच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. गाण्यांच्या माध्यमातून मुलींना वाचवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बातमी लिहिपर्यंत हे गाणं सुमारे १५ लाख लोकांनी पाहिलं आहे. त्यापैकी सहा हजार लोकांनी या गाण्याला लाइक्स केलं आहे तर जवळपास ३९ हजार लोकांनी या गाण्याला डिसलाइक्स ३९ हजार लोकांनी डिसलाइक केलं. एवढंच नाही तर यूट्यूब आणि सोशल मीडियावरही या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यामुळे बर्‍याचदा चर्चेत असतात. लॉकडाउन दरम्यान त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या एका मीटिंगमध्ये बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या टेबलवर काही कागदाची पानं होती, ज्यावर 'फोटो काढत रहा' असा मेसेज लिहिला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kJsQ5f

Post a Comment

0 Comments