 
मुंबई- आमिर खानची मुलगी अनेक विषयांमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने स्वतःच्या डिप्रेशनबद्दल मोकळेपणाने चर्चा केली होती. याआधी ती तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रियकर मिशाल कृपलानीशी तिचं ब्रेकअप झालं. आता तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम बहरलं असून ती या टप्प्याचा मनमुरादपणे आनंद घेत आहे. लॉकडाउन दरम्यान वाढली मैत्री इरा खान जवळपास दोन वर्ष मिशालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही कारणांमुळे हे नातं फार काळ टिकलं नाही. आता एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार इरा खान पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. मात्र, यावेळी ती याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. विशेष म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार, इरा वडील आमिर खानचा फिटनेस कोच नुपूर शिखरे याला डेट करत आहे. लॉकडाउन दरम्यान दोघांची जवळीक वाढल्याचंही सांगितलं जात आहे. इराने नुपूरच्या हातावर गोंदवला टॅटू अशीही बातमी आहे की इराने तिची आई रीना दत्तशी नूपुरची ओळख करून दिली. याशिवाय इराने नुकतंच टॅटू गोंदवण्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. यानंतर तिने पहिला टॅटू नुपूरच्या हातावरच गोंदवला. स्वतः इराने सोशल मीडियावर नूपूरला टॅटू शेअर केला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VcKrbv
 

 
0 Comments