Ticker

6/recent/ticker-posts

वर्दीतली माणुसकी; खांद्यावरून जखमी महिलेला रुग्णालयात पोहचवलं

: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये मंगळवारी एक गंभीर घडला होता. एक मिनी ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्यानंतर त्यातून प्रवास करणारे जवळपास ३०-३५ झाले होते. या मुजरांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच आणि योग्य उपचार करणं शक्य झालं. उल्लेखनीय म्हणजे, या अपघातानंतर रुग्णालय व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळही समोर आला. जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी स्ट्रेचरही उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. अशा वेळी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खांद्यावर मजुरांना उचलून रुग्णालयापर्यंत पोहचवल्याचं दृश्यं सोशल मीडियाद्वारे समोर आलं. ही घटना चरगवा भागात घडली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे सर्व मजूर कोहलापासून शाहपुराला कामासाठी जात होते. याच दरम्यान घुघरीजवळ मालवाहक मिनी ट्रक पलटला. या मिनी ट्रकमधून प्रवास करणारे ३०-३५ मजूर गंभीर जखमी झाले. या सर्वांना स्थानिकांच्या मदतीनं चरगवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात हलवलं. सध्या या सर्व मजुरांची प्रकृती स्थिर आहे. वाचा : वाचा : या गाडीचा मालक मल्लू राय नामक व्यक्ती आहे. दुर्घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मजुरांना खांद्यावर घेऊन जाताना पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंवरून नागरिक या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचं तोंड भरून कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये एक ५७ वर्षीय पोलीस अधिकारी एका जखमी महिलेला आपल्या खांद्यावरून रुग्णालयात नेत असताना दिसत आहेत. वयाची पन्नाशी कधीच उलटून गेलेल्या या पोलिसाच्या तत्परतेची दाद द्यावी तेवढी कमीच असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पोलीस दलात (ASI) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असं आहे. २००६ साली गुंडांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या हाताला गंभीर जखमही झाली होती. यामुळे त्यांचा एक हात जवळपास निकामी ठरला होता. तरीदेखील त्यांनी मागे-पुढे न पाहता जखमींना वेळीच मदत उपलब्ध करून दिली. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kEs0GU

Post a Comment

0 Comments