मुंबई- कपिल शर्माला अनायरा नावाची एक गोंडस मुलगी आहे. येत्या १० डिसेंबरला ती एक वर्षांची होईल. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी गिन्नी पुन्हा एकदा गरोदर आहे. याबद्दल स्वतः कपिलने कोणतीही माहिती दिली नाही. टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, गिन्नी गरोदर असून पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात ती बाळाला जन्म देईल. गिन्नीची काळजी घेण्यासाठी कपिलची आई आणि गिन्नीचं कुटुंबिय मुंबईत आले आहेत. डिसेंबरमध्ये आहे लग्नाचा दुसरा वाढदिवस अलीकडेच कपिलची जवळची मैत्रीण भारती सिंगने करवाचौथ निमित्त इन्स्टाग्रामवर लाइव्ह केलं होतं. या व्हिडिओच्या शेवटी गिन्नीची झलकदेखील दिसली होती. यात गिन्नीचा बेबी बंप स्पष्टपणे दिसला होता. गिन्नीनेही मोजक्या लोकांसह करवाचौथ साजरा केला. विषेष म्हणजे कपिलने दिवाळीचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये गिन्नीने बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला होता. कपिल आणि गिन्नी येत्या १२ डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. तर त्यांची मुलगी रोजी आपली लग्नाची दुसरी वर्धापनदिन साजरा करतील आणि त्यांची मुलगी अनायरा १० डिसेंबरला एक वर्षाची होईल. कमी केलं ११ किलो वजन दरम्यान, लॉकडाउनमध्ये कपिल शर्माने आपलं संपूर्ण लक्ष वजन कमी करण्यावर दिलं. लॉकडाउननंतर जेव्हा तो पहिल्यांदा सर्वांसमोर आला तेव्हा त्याचा नवा लुक पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. तो आधीपेक्षा अधिक स्लिम आणि देखणा दिसत होता. लॉकडाउनमध्ये त्याने जवळपास ११ किलो वजन कमी केल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउनपूर्वी तो ९२ किलो वजनाचा होता. तर वजन कमी झाल्यानंतर तो ८१ किलो एवढा झाला. सध्या तो एका वेब सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32YLZd6

0 Comments