Ticker

6/recent/ticker-posts

Unlock 5: ७ महिन्यांनंतर देशात उघडणार चित्रपटगृहे, स्विमिंंग पूल; नियम पाहा!

नवी दिल्ली: देशात अनलॉक-५ () च्या अनेक तरतूदी आजपासून लागू होत आहेत. याबरोबरच दीर्घ प्रतीक्षेनंतर देशातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, आणि मनोरंजन पार्क आजपासून उघडणार आहेत. चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्ससाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सविस्तर जारी केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत करोनाचा संसर्ग वाढण्याची स्थिती निर्माण होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक दुसरी सीट रिकामी सोडली जाणार आहे. चित्रपटगृहाच्या पूर्ण क्षमतेच्या ५० टक्के दर्शकांनाच आत येण्याची परवानगी असेल. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना मास्क लावणे गरजेचे असेल. आत व्हेंटिलेशनची योग्य व्यवस्था असणे आवश्यक असून एसीचे तापमान २३ डीग्री सेल्सियसहून अधिक ठेवावे लागणार आहे. रिकाम्या सीटवर क्रॉस मार्क ज्या सीटवर प्रेक्षकाला बसायचे नाही, त्या सीचवर क्रॉसची फूली मारलेली असेल. चित्रपटगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे गरजेचे आहे. चित्रपट पाहत असताना कोणत्याही वस्तू खाण्याला आणि पिण्याला पूर्णपणे प्रतिबंध असणार आहे. तिकीट खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच असणार आहे. चित्रपटगृहात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी गेट, लॉबी वेळोवेळी सॅनिटाइझ केली जाईल आणि प्रत्येक शोनंतर चित्रपटगृहाची स्वच्छता केली जाईल. चित्रपटगृहाच्या सर्व दर्शकांना सॅनिटाइझ उपलब्ध करून देणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असेल. PVR चे ४८७ स्क्रीन सुरू आज पासून देशातील १० राज्यांमध्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सिल्व्हर स्क्रीन सुरू होत आहेत. गुरुवारी पीव्हीआरचे ४८७ स्क्रीनवर चित्रपट दाखवणे सुरू होईल असे वृत्त पीटीआयने पीव्हीआर सिनेमाच्या हवाल्याने दिले आहे. वेटिंग भागात ६ फुटांचे अंतर राखणे गरजेचे उत्तर प्रदेशात देखील आजपासून चित्रपटगृहे उघडणार आहेत. चित्रपटगृहातील कॉमन एरिया आणि वेटिंग एरियामध्ये प्रत्येक व्यक्ती कमीतकमी ६ फुटांचे अंतर ठेवूनच उभा राहील, असे राज्याचे प्रधान सचिव आर. के. तिवारी यांनी माहिती देताना सांगितले. कॉन्टॅक्ट लेन्स सॅनिटायझरची व्यवस्था देखील आवश्यक असणार आहे. ऑडिटोरियममध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची थर्मल तपासणी केली जाईल. जलतरणपटूंना द्यावा लागणार करोना निगेटीव्ह रिपोर्ट आपले आरोग्य उत्तम असल्याचा पुरावा जलतरणपटूला द्यावा लागणार आहे. या व्यतिरिक्त त्याला करोना निगेटीव्ह रिपोर्ट देखील द्यावे लागणआर आहे. वाचा- मनोरंजन पार्क पार्क सुरू झाल्यानंतर बसण्याच्या जागा आणि इतर वस्तूंना पार्क उघडण्यापूर्वी आणि बंद झाल्यानंतर स्वच्छ केले जाणार आहे. शिवाय दिवसातून अनेकदा स्वच्छता केली जाईल. पार्कमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापनाला योग्य सुरक्षा अधिकाऱ्यांची तैनाती करावी लागणार आहे. गर्दी लक्षात घेऊनच तिकिटे जारी करावी लागणार आहेत. पार्कासाठीही ऑनलाइन तिकिटांना प्रोत्साहन द्यावे लागणार. वाचा- वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iWqbnT

Post a Comment

0 Comments