नवी दिल्ली : करोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर आणि पोलीस यांनी आपले प्राण पणाला लावत अनेक नागरिकांना करोनापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली. करोनाविरुद्धच्या या लढाईत आत्तापर्यंत तब्बल ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. ही माहिती खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिलीय. गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील 'राष्ट्रीय पोलीस स्मारका'वर श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते बोलत होते. वाचा : वाचा : 'आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक आपल्या वीर जवानांच्या शहिदत्वाची आठवण करून देतं. स्वातंत्र्यकाळापासून आत्तापर्यंत देशातील सर्व राज्याच्या पोलीस आणि सशस्त्रदलाच्या ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांनी वाहिलेल्या एका एका रक्ताच्या थेंब देशाला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन गेलाय' असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोलीस स्मृती दिनानिमित्ताननं केंद्रीय राखीव पोलिस दलाला (CRPF) शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात सीआरपीएफ 'सर्वोत्कृष्ट दल' असल्याचं सांगितलंय. वाचा : वाचा : प्रत्येक वर्षी २१ ऑक्टोबर रोजी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांना नमन केलं जातं. १९५९ साली भारत - चीन तणावादरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सीआरपीएफच्या १० जवानांच्या आठवणीत हा दिवस पाळला जातो. या दिवसानंतरच दोन्ही देशांच्या नात्यात आणखीन कटुता आली होती. त्यानंतर जानेवारी १९६० मध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महानिरीक्षकांनी वार्षिक परिषदेत सीआरपीएफ जवानांची आहुती विसरता कामा नये, असा निर्णय घेताना २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HkzYXN

0 Comments