Ticker

6/recent/ticker-posts

करोना: रशियन लशीचे दुष्परिणाम ? संशोधकांचा 'हा' मोठा दावा!

मॉस्को: जगात करोना संसर्गाची पहिली लाट अद्यापही पूर्णपणे ओसरली नसताना दुसरी लाटही आली आहे. करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असताना लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. करोनाला अटकाव करण्यासाठी रशियाने आपल्या 'स्पुटनिक व्ही' या लशीला मान्यता दिली होती. आता या लशीच्या परिणामकतेबाबत आणि साईड इफेक्टबाबत मोठे वृत्त समोर आले आहे. चाचणीत स्पुटनिक व्ही लस सुरक्षित आढळली आहे. तर, चाचणीत सहभागी झालेल्या जवळपास ८५ टक्के स्वयंसेवकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे वृत्त आहे. 'द मॉस्को टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'स्पुटनिक व्ही' लशीचा डोस दिलेल्या ८५ टक्के स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. ऑगस्ट महिन्यात या लशीला मंजुरी दिली असल्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले होते. वाचा: मॉस्कोतील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले की, स्पुटनिक व्हीची लस दिलेल्या ज्या स्वयंसेवकांना साइड इफेक्टस जाणवले. ते फारसे गंभीर नाही. लस दिल्यानंतर काही स्वयंसेवकांना ताप, डोके दुखी आदी लक्षणे जाणवली आहेत. अशा प्रकारचा त्रास १५ टक्के स्वयंसेवकांना जाणवला आहे. तर, उर्वरीत ८५ टक्के स्वयंसेवकांवर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. वाचा: रशियाने 'स्पुटनिक व्ही' लशीला मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेसह इतर अनेक पाश्चिमात्य देशांनी आक्षेप घेतला होता. या लशीच्या चाचणीची माहिती समोर आली नव्हती. तरीदेखील रशियन सरकारने या लशीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता एका परदेशी संशोधन संस्थेच्या देखरेखीत ४० हजारजणांवर चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडेही देण्यात येणार आहे. आतापर्यंत १९ हजार स्वयंसेवकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, सहा हजार स्वयंसेवकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: भारतातही स्पुटनिक व्ही या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. भारतात या लशीची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंड आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने चाचणी करण्यास परवानगी मागितली होती. रशियाने करोनावरील पहिल्या लशीचे नाव 'स्पुटनिक व्ही' असे ठेवले आहे. जगात सोव्हिएत रशियाने पहिल्यांदा 'स्पुटनिक' हा उपग्रह सोडला होता. त्याच्याच नावावरून या करोना लशीला नाव देण्यात आले आहे. रशियाने आतापर्यंत दोन लशींना मंजुरी दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oy4aQ0

Post a Comment

0 Comments