Ticker

6/recent/ticker-posts

संतप्त गावकऱ्यांनी आमदाराला चपला फेकून मारल्या; व्हिडिओ व्हायरल

अमरावती: तेलंगणमध्ये पावसाने () मोठे नुकसान झाले असून राज्यातील इब्राहिमपटणमच्या मेदिपल्ली गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या एका आमदाराला आणि त्याच्या समर्थकांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. पाहणीसाठी आलेल्या आमदारावर आणि समर्थकांवर तेथील लोकांनी चप्पल फेकून मारल्या. इतकेच नाही तर लोकांनी आमदारांच्या गाडीची देखील तोडफोड केलीय. () असे आमदाराचे नाव असून रेड्डी यांना लोकांनी गावात प्रवेशच नाकारला. गावातील जमीन एका औषध निर्मिती कंपनीला देण्याचा घाट घातला जात असून याला गावकऱ्यांचा विरोध आहे. गावकऱ्यांच्या आंदोलनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज आमदार रेड्डी यांचा ताफा गावात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरू केले. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आमदारांच्या गाडीवर चपलांचा वर्षाव केला. काहींनी दगडफेक देखील केली. तातडीने पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. या प्रकरणी पोलिसांनी काही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या बरोबर पोलिसांनी गावच्या सरपंचालाही ताब्यात घेतले आहे. क्लिक करा आणि वाचा बातमी- या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रेड्डी मेदिपल्ली गावात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर रेड्डी यांना गावात प्रवेश द्यायचा नाही, असे गावकऱ्यांनी ठरवले. एका औष ध निर्मिती कंपनीला जमीन द्यावी यासाठी गावकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मचीरेड्डी किशन रेड्डी हे मेदिपल्ली तलावाजवळ पूजा करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यायचा होता. मात्र त्यांना गावकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3k4u5w7

Post a Comment

0 Comments