लंडन: करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या थैमानामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. करोनाचा आजार झाल्यानंतरही अनेकजणांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, करोनाचे काही परिणाम होत असल्याचेही समोर येत आहे. करोना संसर्गाच्या कारणामुळे काही रुग्णांमध्ये कायम स्वरुपी बहिरेपणाची समस्या निर्माण झाली असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. ब्रिटनमधील 'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन' च्या तज्ञांसह वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या संसर्गामुळे येण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्टेरॉइड्सद्वारे योग्य उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. बहिरेपण का येते, याचे कारण स्पष्ट नाही, परंतु फ्लूसारख्या व्हायरल संसर्गानंतरही अशीच समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी म्हटले. करोनामुळे बहिरेपण आलेल्या बाधितांची संख्या कमी असल्याचेही समोर आले आहे. वाचा: 'बीएमजे केस रिपोर्ट्स' नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यक्तीला अस्थामाचाही आजार आहे. करोनामुळे गंभीर आजारी झाल्यानंतर अचानक त्याच्या श्रवण क्षमेतवर परिणाम झाला. करोनाआधी या व्यक्तीला श्रवणाबाबत कोणतीही समस्या नव्हती. वाचा: त्यानंतर या व्यक्तीवर स्टेरॉइडच्या गोळ्या आणि काही औषधे देण्यात आले. त्यानंतर काही प्रमाणात त्यांना पुन्हा ऐकू येऊ लागली. करोनाबाधितांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यादृष्टीने यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून ही समस्या का निर्माण होतेय याची माहिती झाल्यास योग्य उपचारही करता येतील असेही संशोधकांनी म्हटले आहे. वाचा: वाचा: दरम्यान, करोनाची बाधा झाल्यानंतर संबंधित बाधितांच्या शरीरात अॅण्टीबॉडी विकसित होते. त्यामुळे दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो असे म्हटले जाते. करोनाची दुसऱ्यांदा बाधा झाल्यास मृत्यूचा कमी धोका असल्याचाही दावा करण्यात येत होता. मात्र, दुसऱ्यांदा बाधा झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यांदा बाधा झाल्यानंतर प्राण गमावलेली ही पहिलीच बाधित आहे. या ८९ वर्षीय महिलेवर कर्करोगाचेही उपचार सुरू होते. दोन महिन्याच्या कालावधीत करोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनपासून संसर्ग झाला होता. मात्र, या दोन संसर्गाच्या दरम्यान या महिलेला दोन वेळेस करोनाची लागण झाली. पहिल्यांदा करोनाची बाधा आल्यानंतर उपचार सुरू होते. करोनाची लक्षणे दिसू न लागल्यामुळे या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34YJFTF

0 Comments