
नवी दिल्ली : भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार थोडक्यात एका अपघातातून बचावलेत. मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरनं यशस्वीरित्या '' केल्यानंतर धोका टळला. बिहार निवडणुकीत भाजपच्या प्रचारात मनोज तिवारी सध्या व्यग्र आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज तिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले असताना ते एका अपघातातून थोडक्यात बचावले. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला एमर्जन्सी लँडींग करावं लागलं. वाचा : वाचा : उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजप नेते मनोज तिवारी यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सभांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन या सुरक्षेत वाढ करण्यात आली. गर्दीमुळे मनोज तिवारी यांच्या जीवाला धोका असल्याचंही सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी विशेष सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली. मनोज तिवारी यांच्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं. मनोज तिवारी साठी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून धुरा सांभाळत आहेत. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35G8yUM
0 Comments