Ticker

6/recent/ticker-posts

पुणे: पोलिसाचा स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न, झटापटीत ट्रिगर दाबला अन्...

म. टा. प्रतिनिधी, : मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली. जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळा, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. यावेळी सस्ते व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाले. वादात सस्ते यांनी ताणावाखाली येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार लक्षात येताच बेंडाळे यांनी त्यांना अडविले. अडवत असताना झालेल्या झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली आणि बेंडाळे यांना लागली. यात बेंडाळे जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून हा प्रकार घडला आल्याचे सांगण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HeIirT

Post a Comment

0 Comments