: बिहार निवडणुकीसाठी राज्यात रणधुमाळी सुरू आहे. करोनाकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. पण, अनेक ठिकाणी व्हर्च्युअल नाही तर मैदानातल्या जाहीर सभाही भरवल्या जात आहेत. 'नवभारत टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंगेर जिल्ह्यात दोन सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन्ही सभांमधलं चित्र परपस्परविरोधी होतं. यातील पहिली सभा मुंगेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रणब यादव यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , भूपेंद्र यादव आणि खासदार ललन सिंह हेदेखील उपस्थित होते. तर इथून काही किलोमीटर अंतरावर तारापूरमध्ये विरोधी नेते यांची सभा भरली होती.
भाजपची रॅली मुंगेर शहरापासून काही अंतरावर आणि जेडीयूचे अनेक बडे नेते सहभागी झाले होते. परंतु,रॅलीला फारशी गर्दी आढळून आली नाही. जवळपास १००० लोकंही या सभेत नव्हती. मागच्या बाजुच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. अनेक खुर्च्या मांडल्याही गेल्या नव्हत्या. मांडलेल्या खुर्च्यांवर मोदींचा मुखवटा घातलेली अनेक लहान मुलंही बसलेली पाहायला मिळाली.
तेजस्वी यादव यांची रॅली भाजपच्या सभेपासून ४० किलोमीटर अंतरावर तारापूरमध्ये महाआघाडीचे उमेदवारी तेजस्वी यादव मतं मागण्यासाठी दाखल झाले होते. तेजस्वी यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी जमा झाली होती. परंतु, सभेसाठी हजर झालेल्या अनेकांनी मास्क परिधान केले नव्हते. 'सोशल डिस्टन्सिंग'चा कुठेही थांगपत्ता नव्हता. तेजस्वी यांना पाहण्यासाठी लोकांनी आसपासच्या अनेक घरांच्या छतावरदेखील गर्दी केली होती. निर्धारीत वेळेपेक्षा जवळपास दोन तास उशिरानं तेजस्वी इथं दाखल झाले. परंतु, त्यांना पाहण्यासाठी लोकांनी तळपत्या उन्हात एवढा वेळ वाटही पाहिली. सभेत दाखल झाल्यानंतर तेजस्वी यांनी १० मिनिटांचं भाषण दिलं. निकाल १० नोव्हेंबरला पण, बिहार निवडणुकीच्या मैदानात ही 'मैदानातली गर्दी' खरंच मतांच्या स्वरुपात समोर येणार का? की निकालात वेगळंच चित्रं पाहायला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर येत्या १० नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o0gYi3

0 Comments