Ticker

6/recent/ticker-posts

घर खरेदी करताय;'एसबीआय'ची गृहकर्जावर सवलत आणि बरेच काही...

मुंबई : सणासुदीच्या निमित्ताने घर खरेदीदारांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी देशातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृह कर्ज दरांत ०.२५ टक्क्याची सवलत जाहीर केली आहे. () गृह कर्ज ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोअरनुसार आणि योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे घर खरेदी केल्यास पाव टक्का (०.२५ टक्के) व्याजदरात सवलत मिळणार आहे. एसबीआयतर्फे ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी ६.९० टक्के तर ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी ७ टक्के व्याज दर दिला जाणार आहे. सणांनिमित्त नुकत्याच जाहीर केलेल्या इतर ऑफर्सबरोबरच एसबीआयने देशभरात ३० लाख ते २ कोटीपर्यंतच्या गृह कजासाठी ग्राहकांना आधीच्या ०.१० टकक्यांऐवजी ०.२० टक्के सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार ही सवलत दिली जाणार आहे. आठ मेट्रो शहरांतील गृह कर्ज ग्राहकांना हीच सवलत तीन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवर दिली जाणार आहे. योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास सर्व गृह कर्जांसाठी ०.५ टक्क्याची अतिरिक्त सवलत दिली जाईल. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस सेट्टी म्हणाले, ‘या सणासुदीच्या हंगामातील आमच्या संभाव्य गृह कर्ज ग्राहकांसाठी अतिरिक्त सवलत जाहीर करताना आनंद होत आहे. गृह कर्जावरील एसबीआयच्या सर्वात कमी व्याजामुळे घर खरेदीदारांना आता त्यांच्या स्वप्नातले घर खरेदी करण्याची प्रेरणा मिळेल. संपूर्ण देश कोविडनंतरच्या काळासाठी सज्ज होत असतानाच आम्हाला ग्राहकांच्या मागणीत वाढ दिसून येत असून एसबीआयमधे आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा देत राहू.’ वाहन आणि वैयक्तिक कर्जावर प्रक्रिया शुल्क माफस्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच रिटेल ग्राहकांसाठी विविध सुविधा जाहीर केल्या असून त्यात चारचाकी, सोने, वैयक्तिक कर्जावर १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफीचा समावेश हे. रिटेल ग्राहकांना आता ७.५ टक्क्यांपासून सुरू होणारे चारचाकीसाठीचे कर्ज मिळवता येईल. सोने कर्ज आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांनाही येत्या सणांच्या काळात अनुक्रमे ७.५ टक्के आणि ९.६ टक्क्यांइतक्या कमी व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना योनोच्या माध्यमातून केवळ काही क्लिक्सच्या मदतीने पेपरलेस, पूर्व मंजुरी कर्ज तसेच इन्स्टा होम टॉप- अप कर्ज मिळवता येणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dS9c5e

Post a Comment

0 Comments