Ticker

6/recent/ticker-posts

दसऱ्याची चाहूल अन् सोने तेजीत; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने

मुंबई : मागील आठवडाभर नफावसुलीचा दबाव झेलणाऱ्या सोने आणि चांदीने आज मात्र यू टर्न घेतला. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफांनी केलेल्या खरेदीने आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ०.४१ टक्क्यांनी वधारला असून चांदीच्या दरात १.५१ टक्के वाढ झाली आहे. सध्या सुरू असणारे नवरात्र आणि आगामी दिवाळीमध्ये दागिन्यांच्या विक्रीत वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस दसरा आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कमॉडिटी बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये दुपारी १२ वाजता सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०७५५ रुपया झाला आहे. त्यात २०८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलोला ६२६०५ रुपये झाला असून चांदी ९२९ रुपयांनी वधारली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १९०० डॉलरच्या आसपास आहे. निवडणुकीपूर्वी अमेरिकन संसदेकडून आर्थिक पॅकेजची घोषणा होईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १९००. २१ डॉलर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २४.२० डॉलर आहे. चालू वर्षात सोन्याच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी नफावसुली झाली आणि सोने जवळपास ६००० उपायांनी स्वस्त झाले. . goodreturns या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५२० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०५२० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३७८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१३२० रुपये आहे.चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१०७० रुपये आहे. सोने-चांदी आयात करणारा भारत हा जगातील प्रमुख देश आहे. दर वर्षी भारतात जवळपास ८०० ते ९०० टन सोन्याची आयात होते.एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत चांदीच्या आयातीतही मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत ५,५४३ कोटी रुपयांची चांदीची आयात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या आयातीच्या तुलनेत यंदा ६४.४ टक्क्यांची घसरण झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/356dEt2

Post a Comment

0 Comments