बीजिंग: सीमा प्रश्नी भारतासोबत तणाव सुरू असताना आता चीनने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताने तैवान कार्ड खेळणे बंद करावे, अन्यथा चीनदेखील भारतातील काही राज्यांतील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देईल, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्सने दिली आहे. ईशान्य भारतातील दहशतवादी, फुटीरतावादी चळवळींना चीनकडून शस्त्रे आणि आर्थिक मदत करत असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. बीजिंग फॉरेन स्टडीज युनिर्व्हसिटीमधील अॅकेडमी ऑफ रिजनल अॅण्ड ग्लोबल गर्व्हनन्सचे वरिष्ठ रिसर्च फेलो लाँग शिंगचुन यांनी 'ग्लोबल टाइम्स'मध्ये म्हटले की, भारतातील अनेक माध्यमांनी तैवानच्या राष्ट्रीय दिवसाची जाहिरात दाखवली. त्याशिवाय एका वाहिनीने परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांची मुलाखतही दाखवली. यामुळे तैवानच्या फुटीरतावाद्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आता भारत खेळत असलेल्या तैवान कार्डला प्रत्युत्तर देण्याची चर्चा चीनमध्ये होत आहे. वाचा: भारताकडून चीनच्या 'वन नेशन' धोरणाला पाठिंबा असून तैवानच्या स्वतंत्र होण्याला पाठिंबा नाही. त्यामुळेच चीननेदेखील भारतातील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देत नाही. तैवान आणि भारतातील फुटीरतावादी चळवळ ही एकाच श्रेणीतील आहे. भारताने जर तैवान कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. तर, चीनदेखील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. वाचा: चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, भारतीय सैन्याने ते अडीच फ्रंटवर लढाई करण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. यामध्ये पाकिस्तान, चीन आणि चीनमधील अंतर्गत विद्रोहाकडे भारताचा इशारा आहे. चीनमधील अंतर्गत विद्रोहात फुटीरतावादी आणि दहशतवादी सहभागी आहेत. भारताने जर तैवानला पाठिंबा दिल्यास तर चीनदेखील ईशान्य भारतातील त्रिपुरातील, मेघालय, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि नागालँडमधील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देऊ शकतो. वाचा: ही राज्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघराज्यात समाविष्ट झाली आहेत. मात्र, यातील अनेकजण स्वत: ला भारतीय समजत नाही त्यामुळे वेगळ्या देशाची मागणी या ठिकाणच्या फुटीरतावाद्यांकडून करण्यात येते. या फुटीरतावाद्यांनी चीनकडून भारताविरोधात पाठिंबा मागितला आहे. मात्र, भारतासोबत असलेल्या मैत्रीमुळे चीनने अद्यापही पाठिंबा दिला नाही. चीन इतर देशांच्या अखंडतेचा सन्मान करत असल्याची टिमकी 'ग्लोबल टाइम्स'च्या या लेखात वाजवण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31kwTy5

0 Comments