Ticker

6/recent/ticker-posts

वडिलांच्या मृत्यूनंतर चिराग यांनी घेतली आपल्या सावत्र आईची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते यांचं सोमवारी त्यांच्या गावात अर्थात शहरबन्नीत श्राद्ध घालण्यात आलं. यावेळी त्यांचा मुलगा हेदेखील इथं उपस्थित झाले होते. तसंच यावेळी पासवान यांची पहिली पत्नी आणि चिराग पासवान यांची सावत्र आई यादेखील इथं उपस्थित होत्या. चिराग पासवान आणि त्यांच्या सावत्र आईमध्ये याअगोदर संवाद नव्हता. परंतु, आपल्या पित्याच्या श्राद्धासाठी आपल्या वडिलोपार्जित घरी पोहचलेल्या चिराग यांनी राजकुमारी देवी यांचेही आशीर्वाद घेतले. परंतु, यावेळी दोघांमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही. रामविलास पासवान हे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शहरबन्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. रीना - रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत. राजकुमारी देवी आजही खगडिया शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरबन्नी या गावातच राहतात. पासवान यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतरही त्यांच्या नावानं कुंकू लावत राजकुमारी देवी आपल्या पतीच्या भल्यासाठीच प्रार्थना करत होत्या. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : 'चिराग हाच आमचा मुलगा' 'नवभारत टाईम्स'शी बोलताना राजकुमारी देवी यांनी चिराग पासवान यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच एक अटही समोर ठेवली. 'आशीर्वाद तो हम यहीं शर्त पर देंगे कि हमरो अब वहीं एगो (एक) बेटा है. पापा के रहते हुए, वह हमें नहीं देखते थे। लेकिन अब उ देखई छ हमरा (आता त्यालाच आमच्याकडे पाहावं लागेल)। वो जो कहेगा अब हम सुनेंगे, हम भी जो कहेंगे, वो अब सुनेंगे' असं राजकुमारी देवी यांनी म्हटलंय. राजकुमारी देवी यांच्या दोन्ही मुली पाटण्यात राहतात. रामविलास पासवान आपल्या दोन्ही मुलींच्या संपर्कात होते. त्यांना अधून-मधून ते भेटही देत होते. पहिल्यांदा ते आमदार बनले तेव्हा आपल्याला पाटण्याला घेऊन गेले होते. हाजीपूरहून खासदार बनले तेव्हाही आम्ही पाटण्यातच राहत होतो. दुसऱ्यांदा खासदार बनले तेव्हा मात्र ते आमच्यापासून दूर झाले होते. त्यामुळे आम्ही बोलणं बंद केलं होतं, अशा आठवणीही यावेळी राजकुमारी देवी यांनी जागवल्या. चिराग पासवान यांच्याबद्दल बोलतान 'ते इथं आले आम्ही माझी गळाभेट घेतली. केवळ भेट झाली पण ते काहीही बोलले नाही केवळ पायाला हात लावला आणि ते निघून गेले' असंही त्यांनी म्हटलं. चिराग पासवान यांना काय म्हणणार? या प्रश्नावर त्यांनी म्हटलं. 'ते जिंकणार... माझी आठवण काढणार तर ते एकाच दमात जिंकणार'. आता उतारवयात गावात एकटी कसं राहणार? हा प्रश्नही राजकुमारी देवी यांच्यासमोर आहे. मुली भेटायला येतात परंतु, त्यांची काळजी मात्र गावातील लोकच घेतात. दोन दिवसांपूर्वीच लहान मुलगी भेटून गेल्याचंही राजकुमारी देवी यांनी म्हटलं. इतर बातम्या : वाचा : वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3m3vPGK

Post a Comment

0 Comments