पालनपूर: गुजरातच्या बनासकांठामधील डीसा गावात एका १२ वर्षीय मूकबधिर केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचे शिर धडावेगळे केले होते. पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपीला अटक केली आहे. तो पीडित मुलीचा नातेवाइक असल्याची माहिती समोर आली आहे. हाथरसमधील घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. आता गुजरातमधील बनासकांठामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी तिच्या दूरच्या नातेवाइकाला अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक कुशल ओझा यांनी शनिवारी सांगितले की, पीडितेचा मृतदेह सकाळी दंतीवाडामधील मोती भाखड गावाच्या जवळ एका निर्जन ठिकाणी आढळून आला होता. सुरुवातीच्या तपासात मुलीवर आधी बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मुलीचा नातेवाइक असल्याची माहिती मिळाली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला असून, अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोपी तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, दंतीवाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. आणखी बातम्या वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nWoiv7

0 Comments