Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्रोत्सव : घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा, अद्भूत योग

शारदीय नवरात्राचा प्रारंभ शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा आणि पद्धत आहे. देशातील कोट्यवधी घरांमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे. तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते. सन २०२० मध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? पं. राकेश झा यांच्याकडून जाणून घेऊया... नवरात्रात घटस्थापना करून विशेष व्रतपूजनाचा संकल्प केला जातो. यासाठी घटस्थापना ही शुभ मुहूर्त पाहूनच करावी, असे सांगितले जाते. नवरात्रोत्सव मंडळांनीही याच शुभ मुहुर्तावर घटस्थापन करावी, असा सल्ला दिला जातो. ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०१ मिनिटांनी अधिक मासाची सांगता होऊन निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होईल. शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटांपर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदा असेल. धर्मसिंधू नामक ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे प्रतिपदेच्या प्रथम १६ घडिया आणि चित्रा नक्षत्र तसेच वैधृत योगाच्या पूर्वार्धात घट म्हणजे कलशस्थापना करण्यासाठी शुभ काळ नसतो. ज्योतिषीय गणना आणि पंचांगानुसार, सन २०२० मध्ये १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०७ वाजून २५ मिनिटांपर्यंतची वेळ घटस्थापनेसाठी अनुकूल नाही. यानंतर केलेली घटस्थापना शुभ आणि कल्याणकारी ठरेल, असे सांगितले जात आहे. नवरात्रातील घटस्थापनेसाठी शुभ वेळ व चौघडिया - शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ०७ वाजून २५ मिनिटांपासून घटस्थापनेच्या शुभ मुहुर्ताला प्रारंभ - राहुकाळ सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे. - काल चौघडिया सकाळी ०६ वाजून ३५ मिनिटे ते ०८ वाजून ०३ मिनिटे. - शुभ चौघडिया सकाली ०८ वाजून ०३ मिनिटे ते ०९ वाजून ३० मिनिटे. - अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २८ मिनिटे. - विशेष टीप : १७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ०८ वाजून ०३ मिनिटे ते ०९ वाजेपर्यंतचा काळ घटस्थापनेसाठी उत्तम असून, यानंतर अभिजित मुहूर्तावर कलशस्थापना केली जाऊ शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dGj4Ph

Post a Comment

0 Comments