Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज गुरुवारी पट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना सुखद धक्का दिला. आज कंपन्यांनी पेट्रोल आणि दरात कपात (petrol cut today) केली. आज पेट्रोल ९ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले. दर कपातीमुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.६४ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव प्रती लीटर ७९.५७ रुपये झाले आहे. त्यात १२ पैशांची घट झाली. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.०५ रुपये झाला असून त्यात बुधवारच्या तुलनेत ११ पैसे घट झाली. चेन्नईत पेट्रोल ८ पैशांनी स्वस्त झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा आजचा भाव ८४.९६ रुपये असून डिझेल ७८.३८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.४९ रुपये आहे. डिझेल ७६.५५ रुपये प्रती लीटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८ पैसे आणि डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले. देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. मागील दोन महिने कधी पेट्रोल तर कधी डिझेल दरात कपात केली जात होती. आज बऱ्याच दिवसांनी दोन्ही इंधनाच्या किमतीत कंपन्यांनी कपात केली आहे. अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता. देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४३,७०,१२९ पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत वाढले करोनाचे ८९,७०६ नवे रुग्ण वाढले तसेच २४ तासांत १,११५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DLlwq9

Post a Comment

0 Comments