भरतपूर: राजस्थानमधील अलवर येथे सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असतानाच, आता भरतपूरमध्येही एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. भरतपूरमधील कामा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. १४ वर्षीय मुलगी शेतावर गेली होती. तिला एकटीला पाहून गावातीलच दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कामा पोलीस ठाण्याचे प्रभारी रवी कटारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी शेतावर लाकडे आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी गावातील दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सुटकेसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहून एक आरोपी पळून गेला. तर दुसऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आणखी बातम्या वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hMVNLZ

0 Comments