Ticker

6/recent/ticker-posts

महिलेवर भाच्यासमोरच सामूहिक बलात्कार, अश्लील व्हिडिओ केला शूट

जयपूर: राजस्थानच्या अलवरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ४५ वर्षीय महिलेवर तिच्या भाच्यासमोरच केला. त्यानंतर अश्लील व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. जिल्ह्यातील तिजारा येथे ही घटना घडली. १४ तारखेला ही घटना घडली असून, १७ तारखेला महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिला आपल्या भाच्यासोबत दुचाकीवरून आपल्या माहेरहून परतत होती. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनीच या घटनेचा व्हिडिओ काढला होता. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. महिला ही आपल्या माहेरी भावाकडे पैसे देण्यासाठी गेली होती. परत येत असताना, सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांना पाहिले. शस्त्रांचा धाक दाखवला. त्यानंतर भाच्याला बांधून ठेवले. त्यानंतर त्यातील काही तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार इतर साथीदारांनी मोबाइल कॅमेऱ्यात शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आणखी बातम्या वाचा: महिलेने या प्रकरणी सुरुवातीला तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, या घटनेबाबत तिने आपल्या पतीला सांगितले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारची घटना अलवर जिल्ह्यात घडली होती. पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZSiMz8

Post a Comment

0 Comments